केरळमध्ये होणार्‍या संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या थांबवण्यासाठी मोर्शी येथे निदर्शने

0
721
Google search engine
Google search engine

मोर्शी – केरळ राज्यामध्ये साम्यवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांवर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. केरळ मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी विचारांचे काम करणारे कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहे. या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात केरळमध्ये दि. 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधी मध्ये जनरक्षा यात्रा काढली जात आहे. भाजपा राष्टीय अध्यक्ष खासदार मा. अमितजी शाहा हे स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहेत. या संदर्भात भाजयुमो तर्फे संपूर्ण जिल्ल्यात जागृती करण्याकरिता उपस्थित भाजयुमो जिल्हाध्यक्ष सोपानजी काणेकर, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अजयजी आगरकर, शहराध्यक्ष दीपकजी नेवारे, नगराध्यक्षा शिलाताई रोडे, श्रीकांतजी मांडवे, राजुभाऊ बुरंगे, महिला ता.अध्यक्ष मायाताई बासुंदे नगरसेवक हर्षल चौधरी, सुनील ढोले,भूषण कोकाटे, संदीप रोडे, भाजयुमो ता. अध्यक्ष राहूल चौधरी अनिकेत राऊत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रवी मेटकर, राजा फंदे, अंकुश ठाकरे, निलेश चौधरी, पियुष वासनकर, कुणाल विरुळकर,पवन मेश्राम,शाश्वत देखमुख, अंकुश शिलस्कर, भूषण बंड, आकाश ढोमने,निलेश गनथडे,गजानन राऊत,सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा उपस्थितीत  जयस्तंभ चौक मोर्शी येथे निषेध धरणे निदर्शन पार पडले….