आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने आपदग्रस्त शेतक-यांना मिळणार लाभ.-मोर्शी तालुक्यातील आपद्ग्रस्तांना १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी.

0
703
Google search engine
Google search engine

अमरावती-

मोर्शी तालुक्यात फेब्रुवारी व मार्च २०१६ या कालावधीत वादळी वारा, अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पीके, फळपीकांच्या नुकसानाबद्दल आपदग्रस्तांना मदत देण्यासाठी मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी निधीबाबत शासनाकडे पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नाला लवकरच सर्वोतोपरी यश संपादन होणार आहे.

याबाबत १ कोटी ९ लाख २ हजार रुपये वाढीव रक्कम मिळण्याबाबत मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, शासनाने मोर्शी तहसीलदारांकडून अहवाल प्राप्त करून घेतला आहे. त्यानुसार शासनाकडून सदर अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत आ. डॉ.अनिल बोंडे यांनी सततचा पाठपुरावा केला. सदर निधी प्राप्त होताच तो ६५९ शेतक-यांना तात्काळ वितरीत केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.