राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं, महाराष्ट्र काँग्रेसचा प्रस्ताव – सर्वसंमतीनं मंजूर

0
637
Google search engine
Google search engine

मुंबई | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं सर्वसंमतीनं मंजूर केलाय. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची सर्वसाधारण सभा टिळक भवनात पार पडली. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला.

प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.