तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांना विषबाधा-इडली-सांबरात अळी, रेल्वेने ठोठावला कंत्राटदाराला दंड

0
1039
Google search engine
Google search engine

रत्नागिरी:-

करमाळीहुन मुंबई कडे जाणाऱ्या तेजस एक्सप्रेस मधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे. रत्नागिरी स्थानकापासूनच प्रवाशांना त्रास होऊ लागला होता. उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने तेजस एक्सप्रेस चिपळूण स्थानकात थांबवण्यात आली. विषबाधा झालेल्या २७ प्रवाशांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६ जण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आज कोकण रेल्वेचा स्थापना दिन होता त्याच दिवशी ही घटना घडली आहे.

रत्नागिरी स्थानकातून तेजस एक्सप्रेस सुटल्यानंतर प्रवाशांना त्रास होऊ लागला. उलटया आणि जुलाब होऊ लागल्याने प्रवाशांची प्रकृती खालावली. त्यानंतर चिपळूण स्थानकात तेजस एक्सप्रेस थांबविण्यात आली. विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेतून लाईफकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आम्लेट, कटलेट, सूप प्यायले
करमाळी हुन सकाळी साडेनऊ वाजता तेजस एक्सप्रेस सुटली, काहीवेळातच त्याना नाष्टा आला. नाष्टामध्ये आम्लेट, कटलेट, केक आणि सूप होते. नाष्टा झाल्यानंतर दीड तासाने दोघाना त्रास होऊ लागला. पुढे रत्नागिरी पर्यंत २४ जणांना उलटया व जुलाब होऊ लागले. आयईआरसीटीसी तेजस एक्सप्रेसमध्ये अन्न पुरवते अशी माहिती समोर आली आहे.

उच्चस्तरीय चौकशी करा – खा.राऊत यांनी मागणी

चिपळूण दौऱ्यावर असलेले शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ केअर रुग्णालयात विषबाधा झालेल्या प्रवाशांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली. तेजस एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थ आयईआरसीटीसी पुरवते, त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या प्रवाशांची नावे
हरीश तोमर,साची नायक, मिनाझ मोमीन,अदिती सावर्डेकर, दिनेश कुमार, अरुण भाटिया, प्रणम कुमार, रणधीर नागवेकर, राहुल मंडल, सौरभ उवाळे, मार्टिन फर्नांडिज, शैतून पत्रो, रईस मोमीन, सुशांत नाहक, नॉमिता तिर्की, निधारिका जाधव, मोसेद, संजय पप्र, मोसेद डिसुझा, आरती शहा, रोहित टॅग, आशिका कुमार, निलेश जाधव असे २४ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.