गाव कारभारी साठी जनतेनं दिला कौल आज परीक्षा फैसल्याची ,कोण ठरणार भाग्यवान

0
894
Google search engine
Google search engine

सरपंच आणि सदस्य एकूण 411 उमेदवार आणज 25 ग्रामपंचायत चे भाग्य ईव्हीएम मध्ये

एकूण मतदान 81.096

चांदुर बाजार / बादल डकरे

चांदुर बाजार तालुक्यातील 25 ग्रामपंचायत च्या नवीन सरपंच आणि सदस्य याचे भाग्य आज उजळणार असून त्यामध्ये कोणाचे भाग्य साथ देणार आणि कोणाची वर्णी ही ग्रामपंचायत मध्ये लागणार हे पाहवेच लागेल.
राज्य निवडवणुकी आयोग ने सरपंच निवड ही थेट जनतेतून निवडला जाणार असल्याचे स्पस्ट करताच तालुक्यातील संपूर्ण चित्रच या 25 ग्रामपंचायत च्या निवडवणुकी त स्पष्ट होणार आहे. तसेच उमेदवार याचा पेक्षा आपल्या गटाचा विजय होण्यासाठी अतोनात प्रयन्त करताना यावेळी पाहायला मिडाले.
तसेच निवडणूक दरम्यान कोणत्याच प्रकारचं चे गैर कृती होऊ नये याकरिता ब्राम्हणवाडा थडी हद्दीत होणार्या ग्रामपंचायत निवडवणुक केंद्रावर ठाणेदार सचिन तायवाडे यांनी चोख बंदोबस्त दिला होता.त्याच प्रमाणे चांदुर बाजार शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये येणाऱ्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक गावामध्ये ठाणेदार मुकुंद कवाडे आणि ठाणेदार साळूके यांनी बंदोबत हा चोख ठेवला होता.तसेच सर्व निवडवणुकी केंद्रावर पोलीस उपविभागीय अधिकारी जयंत मीना यांनी स्वतः जाऊन चौकशी केली.
त्याच प्रमाणे अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी व्यक्तट राठोड यांनी सुद्धा दुपारी 4 च्या दरम्यान तहसील कार्यलाय या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि निवडवणुकी संपूर्ण माहिती घेतली यावेळी चांदुर बाजार येथील निवडवणुकी अधिकारी शिल्पा ताई बोबडे ,नायब तहसीलदार विजय गोहाड,निवडणूक विभाग तहसीलदार अर्जुन वांदे, महसूल विभाग नायब तहसीलदार नीलिमा मते उपस्थित होते.
तसेच काल सकाळी मतदान चे उपडेट खालीलप्रमाणे होते.

सकाळी 9 वा 30 मिनिट मतदान टक्केवारी 14.91 %,11वा.30मिनिट ला 31.78%,1वा 30 मिनिट ला 49.60%होते. 3वा.50 मिनिट ला एकूण टक्केवारी 67.86% होती. तर एकूण मतदानाची टक्केवारी पाहता तालुक्यातील 25 ग्रामपंचायत चे मतदान हे 81.096 इतके झाल्याची माहिती निवडवणुकी विभाग कडून मिडळी.