थकबाकीदार ग्राहकांचा होणार विज पुरवठा खंडित

0
556
Google search engine
Google search engine

 महेंद्र महाजन जैन /  रिसोड-

महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणीज्यिक या वर्गवारीतील एकूण ४ लाख ५२ हजार २९४ ग्राहकांकडे  वीज देयकाचे  ५७ कोटी ३२ लाख ८८हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे या ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असून ग्राहकांनी थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

घरगुती, औद्योगिक व वाणीज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे वाशिम मंडळामध्ये असलेल्या सहा उपविभागामध्ये एकूण ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये कारंजा उपविभागात १९ हजार ७४४ ग्राहकांकडे २ कोटी ८२ लाख ७३ हजार, मालेगाव उपविभागात १६ हजार ९८७ ग्राहकांकडे ३ कोटी १८ लाख ४२ हजार, मंगरूळ पीर उपविभागात १४ हजार ७६७ ग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख 11 हजार, मानोरा उपविभागात ९ हजार १३० ग्राहकांकडे १ कोटी २० लाख ८६ हजार, रिसोड उपविभागात १५ हजार १४४ ग्राहकांकडे१ कोटी ९० लाख ९६ हजार तर वाशिम उपविभागात १८ हजार ८७२ ग्राहकांकडे ३ कोटी ८० लाख ४६ हजार एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यामुळे नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.