फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो; पण अजानविषयी कुणी बोलत नाही !

0
837
Google search engine
Google search engine

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांचे विधान

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, समाजवादी आदींना याविषयी काय म्हणायचे आहे ?

 

नवी देहली – प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी वाद होतो. वर्षातून काही दिवसच हे फटाके वाजवले जातात; पण प्रतिदिन पहाटे ४.३० वाजता ध्वनीक्षेपकावरून होणार्‍या अजानविषयी कोणी काहीच बोलत नाही, असे ट्वीट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले.

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने दिवाळीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत तीव्र आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही देहलीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर रॉय यांनी हे ट्वीट केले.

रॉय पुढे म्हणले, ‘‘ध्वनीक्षेपकावरून अजानमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर ‘सेक्युलर’ लोकांचे मौन आश्‍चर्यकारक वाटते. कुराण किंवा हदिसमध्ये ध्वनीप्रदूषणावर अजान करण्याविषयी सांगितलेले नाही. मुअज्जिनच्या मिनारवर मोठ्या आवाजात अजान करता यावी, यासाठी हे मिनार बांधण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपकाचा वापर इस्लामविरोधी आहे.’’ यापूर्वी रॉय यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलतांना ‘एक हिंदु म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर खूश नाही; कारण उत्सवाच्या एका महत्त्वपूर्ण गोष्टीवर बंधन घालण्यात आले आहे. भविष्यात वायूप्रदूषणाचे कारण देऊन हिंदूंच्या अंतिम संस्कारावरही बंदी लादली जाऊ शकते’, असे सांगितले.