एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा : हायकोर्ट

0
761
Google search engine
Google search engine

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे. संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावं, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. उच्चस्तरीय समितीने 15 नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करावं, असा आदेशही मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तर अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 21 डिसेंबरची मुदत कोर्टाकडून देण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

1. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
2. पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
3. जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी