पूर्णामायच्या दिपोत्सवात शेखर भोयर यांची उपस्थिति – डॉ. नयना कडू व आमदार बच्चुभाऊ कडू यांचा स्तुत्य उपक्रम

0
609
Google search engine
Google search engine

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
अमरावती –

अमरावती जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या पूर्णा नदीच्या काठावर डॉ.नयना कडू व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या परिश्रमाने आकार घेत असलेली संस्था म्हणजे पूर्णामाय. खऱ्या अर्थाने या छताखाली कितीतरी निराधार, अनाथ व वंचिताना मायेची ऊब मिळते. गेल्या कित्येक वर्षापासून या पूर्णामायच्या तिरावर वंचित, विधवा, अनाथ, परित्यक्त्या स्त्रियांसोबत कडू दाम्पत्य अर्थपूर्ण “दिवाळी” साजरी करतात.
यावर्षी मलाही अशा भावपूर्ण दिवाळीला उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो.मलाही अशा वंचितांना मदत करता आली तर ते माझे भाग्य असेल असे भावनोद्गार याप्रसंगी शेखर भोयर यांनी काढले. डॉ.नयना कडू व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छाही शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बच्चुभाऊ कडू तर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय शेखर भोयर यांच्यासह डॉ.प्रफुल कडू यांचीही उपस्थिति लाभली.याप्रसंगी पूर्णामाय संस्थेतील अनाथ मुलांना व निराधार स्त्रियांना उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंडितराव मोहोड, विनायकराव खांडे, दिपकराव कळमखेडे, अभिजीत बोंडे, पंकज उईके, उमेश राऊत, संतोष भोरे, अजय बिसेन, विश्वजीत बोंडे, मनिष मोहोड, राहुल मोहोड, अजय गाडे यासह शिक्षक महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.