रिठद येथे स्वाईन फ्लू ची लागण एकाचा मृत्यू, प्रशासन सतर्क

0
785
Google search engine
Google search engine



       रिसोड / महेंद्र महाजन जैन  

-तालुक्यातील रिठद येथे स्वाईन फ्लू चा प्रादुर्भाव झाला असून एका बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भीतीयुक्त वातावरण असून आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनाने अतिशय सतर्कतेने आपली यंत्रणा कार्यान्वित केली आहे.१८मे ला आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रिठद येथे डेरा टाकून प्रत्येक घरोघरी जाऊन तपासणी केली व संशयितांना वाशिम येथे उपचाराकरिता पाचारण केले.नागरिकांनी खबरदारी म्हणून परिसर स्वच्छता ठेवावी व ताप,खोकला, डोकेदुखी,अतिसार इत्यादी असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वरील लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे जेणेकरून संसर्ग टाळता येईल.                                       का होतो स्वाईन फ्लू:-स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, अर्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.                स्वाईन फ्लू पासून सुरक्षित राहण्यासाठी हे करा:-१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.हा आजार प्राणघातक नाही. योग्य उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.