अंधांसाठी आता ब्रेल लिपीत ज्ञानेश्‍वरी उपलब्ध होणार !

0
1301
Google search engine
Google search engine

नाशिक –

सर्वांसाठी वंदनीय आणि अनुकरणीय असलेली ज्ञानेश्‍वरी आता अंध बांधवांसाठीही उपलब्ध होणार आहे. अंधबांधव अरुण भारस्कर हा तरुण ज्ञानेश्‍वरी ब्रेल लिपीत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. अरुण भारस्कर यांनी अंधबांधवांना साहाय्य करण्यासाठी ‘ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ या संस्थेची स्थापना केली असून गेल्या १० वर्षांपासून अंधबांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्‍वरी ब्रेल लिपीत सिद्ध करण्याचे काम चालू आहे.

प्रारंभी ज्ञानेश्‍वरीतील १२, १५, १६ आणि १८ वा अध्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १८ व्या अध्यायात ज्ञानेश्‍वरीचे सार आहे. वरील पहिल्या तीन अध्यायांना १००, तर अठराव्या अध्यायासाठी ८० पृष्ठे लागली आहेत. मुंबईचे महेंद्र मोरे यांनी मंगल फॉन्टमध्ये ब्रेल सिद्ध करून दिला आहे. ठाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून पुस्तकाच्या मुद्रीत करण्याचा व्यय केला जात आहे. प्रारंभी ४०० प्रती सिद्ध केल्या जाणार असून त्याचे स्वागतमूल्य ५० रुपये ठेवण्यात येणार आहे.