शालेय पोषण आहार प्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती दडवली – पंचायतराज समिती अध्यक्षांकडे जनसंग्रामची तक्रार

0
1210
Google search engine
Google search engine

जळगाव / विशेष प्रतिनिधी /-

 

जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेतील अनियमितता व २०१४ मधील मुदतबाह्य साठा जप्तीप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश व्हावेत या मागणीसाठी जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पंचायतराज समितीचे अध्यक्ष ना.सुधीर पारवे यांची भेट घेतली.

श्री.ठाकरे यांनी याबाबत लेखी तक्रार केली.त्यात नमूद केले की, आपली पंचायतराज समिती जळगांव जिल्हा दौर्‍यावर असतांना दौर्‍याच्या पहिल्या दिवशी म्हणजे दि.२५/१०/२०१७ रोजी शालेय पोषण आहार प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही? यासाठी आपल्या समक्ष पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी म.मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी व अधिक्षक, शापोआ पं.स. जळगांव यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिलेली नाही. या प्रकरणी भादवी १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल होण्याचे आदेश व्हावे म्हणून ७९६/२०१७ क्रमांकाने जळगांव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि.०६/१०/२०१७ रोजी खाजगी फौजदारी खटला दाखल केला आहे. याप्रकरणात पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी येत्या दि.१ डिसेंबर २०१७ रोजी सदर प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही? आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्वयंस्पष्ट आदेश मे.न्यायालयाने दिलेले असतांना ही माहिती समितीसमोर येवू दिलेली नाही व विसंगत माहिती समितीसमोर दिलेली आहे.

शालेय पोषण आहाराच्या सन २०१४ मध्ये नियमबाह्य साठा पोलिसांनी जप्त केला म्हणून संबंधित दोषी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने तेव्हापासून आजतागायत हेतुत: दुर्लक्ष करून यामध्ये सहभागी रॅकेटला अभय देण्याची धडपड चालविलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्षरित्या सहभागी जि.प.शिक्षण विभाग प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी सुद्धा भविष्यात सहआरोपी म्हणून संशयाच्या फेर्‍यात आहे.

सदर प्रकरणी विवेक ठाकरे स्वतः तक्रारदार व खाजगी फौजदारी खटला दाखल करणारे अर्जदार असल्याने सन २०१४ मधील मुदतबाह्य साठा प्रकरण आणि यंदा २०१७ मध्ये जि.प.पदाधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेवून याप्रकरणी –
जळगांव जिल्ह्यातील गेल्या ८-१० वर्षातील शापोआ प्रकरणी ठिकठिकाणी झालेल्या तक्रारींचा एकत्रित गोषवारा घेवून यामधील नियमितता व कंत्राटदाराने प्रशासनाची केलेली दिशाभूल याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावा तसेच सन २०१४ मधील मुदतबाह्य साठा जप्त केल्याप्रकरणी व यावर्षी शापोआच्या गोडाऊन तसेच ठिकठिकाणच्या शाळांमधून जि.प.पदाधिकारी व सदस्यांनी स्वत: भेटी देवून किडे असलेल्या निकृष्ट धान्यादी मालाचे नमुने हस्तगत करून तपासणीसाठी दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विसंगत अहवाल दिला म्हणून या कारवाईला जि.प. प्रशासनाने ‘सुमोटो’ न्यायालयात आव्हान द्यावे व याबाबतची आवश्यक ती कारवाई शिघ्र करावी.याबाबतचे आदेश म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांच्यासह संबंधितांना तातडीने करावेत,अशी मागणी श्री.ठाकरे यांनी केली.

यावेळी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे,ग्रामविकास विभागाचे उपसचिव आठवले,जनसंग्रामचे कार्याध्यक्ष किरण वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.