*300 किलो चंदन जप्त ! अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटिल यांच्या पथकाचि कारवाई*

0
768
Google search engine
Google search engine

*प्रतिनिधि – उमेर सय्यद – अहमदनगर-

अहमदनगर पूणे रोडवर सुवर्ण ज्योत हॉटेल जवळ नगर तालुका पोलिसांनी दहा लाख 53 हजार 500 रुपये किमतीचे 301 किलो चंदन आणि 6 लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण 16 लाख 53 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, भरत डांगोरे, सुरेश माळी, गणेश डहाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.