उत्तरप्रदेश सरकारकडून वृंदावन आणि बरसाना तीर्थस्थळ घोषित

0
620
Google search engine
Google search engine

लक्ष्मणपुरी – मथुरेतील वृंदावन आणि बरसाना यांना उत्तरप्रदेश सरकारकडून तीर्थस्थळांचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता येथे मांस, मद्य यांच्या विक्रीवर, तसेच त्यांच्या सेवनावरही बंदी येणार आहे. तसे केल्यास तो गुन्हाही ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णव संप्रदाय याची मागणी करत होता.

राज्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मथुरेतील वृंदावन भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आहे, तर बलराम यांचे क्रीडास्थान आहे. तसेच बरसाना हे राधा यांचे जन्मस्थळ आहे. या पवित्र स्थानी लक्षावधी भाविक देश-विदेशातून येत असतात. यामुळे त्यांना तीर्थस्थळ घोषित करण्यात आले आहे.