सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पूण्यतिथी साजरी

0
1307
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली -:

देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची ३३ वी पूण्यतिथी आणि देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४२ वी जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, राजीव मलिक यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पूण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
उपसंचालक श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
दिली.