शिरजगाव बंड परिसरातील ती पाण्याची टाकी ठरत आहे लोकांकरिता धोकादायक

0
998
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार तालुक्यातील 105 गाव पाणी पुरवठा वितरण करणारी पाण्याची टाकी शिरजगाव बंड ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये असून सदर हू पाण्याची टाकी ही लिकेज असल्याने त्या पासून नुकसान होण्याची भीती आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत परिसरात सन2009 -2012 मध्ये 2.2 लक्ष लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या पाण्याचे टाकीचे बांधकाम करण्यात आले.105 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत या टाकीचे बांधकाम करण्यात आले.मात्र ती टाकी मागील काही दिवसापासून लिकेज असल्याने त्याच प्रमाणे टाकीवर मध माश्याचे पोळे असल्याने परिसरातील लोकांमध्ये एक प्रकारचे दहशीतीचे वातावरण तयार झाले आहे.
पिण्याच्या टाकीच्या भवतालच्या परिसरात वरह याची संख्या ही बरीच वाढले असून पाण्याची टाकी खाली खाणीचे साम्राज्य तयार झाले त्यामुळे त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लोकांच्या आरोग्य धोका पोहचवू अशी शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे प्रशासन यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागील 6 महिन्याच्या कालावधी पासून या पिण्याच्या पाण्याची टाकी लिकेज आहे.तसेच मध माश्याचे पोळे असल्याने परिसरातील नागरिक एक भीतीच्या वातावरण मध्येवावरत आहे संबंधीत प्रशासन यांनी याची दखल घेऊन या प्रश्नावर आपली भूमिका स्पस्ट करावी.

<><><><>

प्रशांत लोणारे रहिवाशी

●<>●<>●<>●<>●<>●<>●

प्रशासन यांनी या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लिकेज लवकरात लवकर जोडावे.तसेच परिसरात स्वछता राखावी जेणे करून नागरिकांच्या आरोग्याशी धोका पोहचणार नाही.नाहीतर याचा प्रतिसाद लवकर देऊ.

>< पवन उर्फ प्रीतेश राऊत
युवासेना उपाध्यक्ष चांदुर बाजार