शाळेत जात असतांना शिक्षक चौधरींवर हल्ला अज्ञात हल्लेखोर पसार

0
682
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 

तालुक्यातील निमगव्हाण येथील शाळेवर जात असतांना जि. प. शिक्षकावर भर दुपारी १२. ३० वाजता अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली.
तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परीषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक संजय पुंडलीकराव चौधरी (वय – ५०)  रा. मंगलमुर्ती नगर, चांदुर रेल्वे हे शाळेचे पंचायत समितीमधील कामे आटोपुन गुरूवारी दुपारी निमगव्हाण येथील शाळेत जात असतांना बग्गी ते जावरा रस्त्याच्या मधात अज्ञात इसमांनी दगडफेक केली व ते थांबले असता त्या अज्ञात काही युवकांनी त्यांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती मिळाली व हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर बेशुध्द  पडले असता काहींनी त्यांना स्थानिक ग्रामिण रूग्णालयात आणले.  मात्र गंभीर इजा असल्यामुळे त्यांना तत्काळ अमरावती कल्याण नगर मधील बागडे हॉस्पीटलमध्ये रेफर करण्यात आले. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असुन पुढील तपास पोलीस करीत आहे..