श्री देवेंद्र भुयार यांच्या चक्काजाम आंदोलनाला यश -मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय !

0
794
Google search engine
Google search engine

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे प्रशासन झुकले !

१५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान !

रुपेश वाळके / मोर्शी –

मोर्शी तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या वादळी वारा, अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतकाऱ्यांकरिता देवेंद्र भुयार यांनी विविध आंदोलन करून त्याचा पाठ पुरावा करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ कोटी ९ लक्ष २ हजार निधी प्राप्त होणार असल्याचे मोर्शी येथील तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी सांगितले .

२०१६ मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, या पॅकेजच्या मदतवाटपामध्ये झालेल्या मदतीसाठी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांवर पिकांचे नुकसान झालेले होते तालुक्यातील जवळपास ८०० शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपीट झेलणार्‍या शेतकर्‍यांना शासन मदत देत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत होता अनेक महिन्यांपासून शेतकरी अनुदानाची वाट पाहत होता मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित झाला होता. प्रशासनाच्या या लालफीतशाहीमुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती , त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दापोरी भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते .

मोर्शी तालुक्यामधील दापोरी , डोंगर यावली , घोळदेव , हिवरखेड , येथील जवळपास ८०० गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च या कालावधीत वादळी वारा, अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या संत्रा , शेती पिके , फाळपिकांच्या नुकसानीसाठी देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता मोर्शी येथे तहसील कार्यालयात लोटांगण आंदोलन , ठिय्या आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दापोरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात केले आणि त्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन येत्या १५ दिवसात मोर्शी तालुक्यातील गारपिटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे मोर्शी येथील तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना सांगितले त्यामुळे मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला .

अखेर मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मदत व पुनर्वसन विभागाने गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाची पूर्ण फाईल तयार करून निधी मंजुरी करिता वित्त विभागाला सादर केली. वित्त विभागाने १ कोटी ९ लक्ष २ हजार एवढा निधीला मंजुरी दिली. तसेच या संदर्भातील आदेश तातडीने वितरीत करावे असे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाला दिले. आता गारपीट ग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा प्रवास सुकर झालेला असून लवकरच गारपीटग्रस्त शेतकर्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी ९ लक्ष २ हजार एवढा निधीला मंजुरी देऊन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत लवकरच उपलब्ध होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांना व मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे सांगण्यात आले . . या निर्णया करिता मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी देवेंद्र भुयार यांचे सुद्धा आभार मानले. तसेच मोर्शी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकर्यांच्या अनुदान , निधी मागणीकरिता शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचे स्वागत केले .