अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी गुंतवणूकदारांची महाराष्ट्रला प्रथम पसंती : श्री सुभाष देसाई

0
1212
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली :-

पतंजली, कोकाकोला, पेपस्किो, ऍमेझोन, ब्रिटानिया या कंपन्यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी प्रथम पसंती दर्शवीली असल्याची, माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

विज्ञान भवनातील सभागृह क्रमांक चार मध्ये ‘महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग’ याविषयीवरील परिसंवादांत बोलताना श्री देसाई यांनी ही माहिती दिली. या परिसंवादात राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, कृषी व फालोत्पादन प्रधान सचिव बिजय कुमार, भारतीय उद्योग संघांचे उपाध्यक्ष, बी. थैयरंगराजन उपस्थित होते. यासह सहभागीमध्ये दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधिंमध्ये प्रस्थापित उद्योजक, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी शिष्टमंडळे, नवोदित उद्योजक, मोठा संख्येने उपस्थित होते.

वर्ल्ड फुड इंडिया-2017 मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योंग मंत्रालयसोबत करार झाले आहेत. याअंतर्गत 65 हजार कोंटीपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात होणार आहे. यामध्ये प्रमुख कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पसंती दिली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणूकीमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 50 टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार उद्योग क्षेत्रात भारताने 130 व्या स्थानाहून 100 व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकही महाराष्ट्रामध्येच आली असल्याचे विवरण आहे. यावरून महाराष्ट्र हे उद्योगप्रिय राज्य असल्याचे जागतीक पातळीवरून शिक्का र्मोतब झाल्याचे स्पष्ट होते, असे श्री देसाई म्हणाले.

अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राची कामगिरी वाखण्याजोगी आहे. महाराष्ट्रातील हापूस आंबा, डाळिंब, संत्रा, द्राक्षे, केळी, सफरचंद, लसून, कांदा, हिरवी मिर्ची, असे अनेक फळ-भाज्या आज निर्यात होत आहेत. याशिवाय आणखी अन्य खादयपदार्थ निर्यात होऊ शकतात. यासर्व प्रक्रियेमध्ये गुणात्मक वाढ होण्याची गरज असून त्या दिशेने महाराष्ट्र शासन पाऊले उचलीत आहे. असे सांगून गुंतवणूकदांरासाठी अधिक मैत्रीपुर्वक वातावरण निर्माण करीत, असल्याचे श्री देसाई यांनी यावेळी म्हणाले. यातंर्गत मेगा फुडपार्क उभारण्यात येत आहेत. यामध्ये विविध सोयी पुरविल्या जातील. यासह शितगृहेही उभारली जात आहे. यासर्वांमुळे मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही श्री देसाई यावेळी सांगितले.

देशातंर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी श्री देसाई यांनी केले.

याकार्यक्रमात काही गुंतवणूकदारांनी तसेच नवोदित उद्योजकांनीही त्यांना स्थानिक स्तरावरी भेडसावणा-या समस्यांविषयी प्रश्न विचारली यावर श्री देसाई यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

उद्योगमंत्री श्री देसाई यांनी तरूण उद्योजकाला केले आश्वस्त

विज्ञान भवनात सुरू असलेल्या परिसंवादाच्या प्रश्नोत्तर सत्रात तरुण नवोदित उद्योजक अमोल बिराजदार यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ऊसावर प्रक्रिया करून गुळ बनविण्याचा उद्योग सुरू करीत आहेत. त्यांना स्थानिक प्रशासनाकडून 24 तास वीज मिळावी यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याबाबत सांगितले. यावर उद्योग मंत्री यांनी तत्काळ ही समस्या सोडविण्याबाबत आश्वस्त केले.

याप्रसंगी ट्रेन्ट हायपर मार्केट प्रा. ली. चे व्यवस्थापिकय संचालक जमशेद डाबु, गोदरेज टायसन फुड ली. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद दास यांनी महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाविषयी माहिती दीली. महाराष्ट्र शासन उद्योग क्षेत्राला अधिक पोषक बनविण्यासाठी उद्योगांकडून सुचना मागवित असून त्या सूचनांचे पालन करीत असल्याचेही या मंचावरून सांगितले. यावेळी बिजय कुमार, सुनिल पोलवाल यांनीही राज्यांच्या कुषी, फलोत्पादन, उद्योग धोरणांची माहिती दिली.