‘रिलायन्स’ची व्हाइस कॉल सेवा १ डिसेंबरपासून होणार बंद

0
757
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) त्यांचा टुजी मोबाइल दिवस भरल्यानंतर आरकॉमने येत्या १ डिसेंबरपासून ‘व्हाइस कॉल सर्व्हिस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरकॉमच्या ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत त्यांचे नंबर दुसऱ्या नेटवर्कशी कनेक्ट करून घ्यावे लागणार आहेत, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली आहे.

आरकॉमवर सध्या ४६ हजार कोटींचं कर्ज आहे. या कंपनीने वायरलेस उद्योगाचं विलिनिकरण करण्याचा करार एअरसेलसोबत केला होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये या करारावर सह्याही झाल्या होत्या. मात्र काही दिवसापूर्वीच हा करार रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आपल्या ग्राहकांना केवळ ४ जी डाटाचीच सर्व्हिस देणार असल्याचं आरकॉमनं ट्रायला ३१ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ग्राहकांना १ डिसेंबर २०१७ रोजी व्हाइस कॉल सर्व्हिस मिळणार नाही. याबाबतची सर्व सुचना ग्राहकांना आधीच दिल्याचंही आरकॉमनं म्हटलं आहे. शिवाय १ डिसेंबरला रिलायन्सची व्हाइस कॉल सर्व्हिस बंद करण्यात आली तरी ३१ डिसेंबरपर्यंत आरकॉमच्या ग्राहकांचे नंबर कन्व्हर्ट करून घेण्याची विनंती मान्य करण्याचे आवाहनही टेलिकॉम कंपन्यांना करण्यात आल्याचं आरकॉमनं स्पष्ट केलं आहे.