आज एमएचटी-सीईटी -2017 परीक्षा – उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेश केंद्रावर प्रवेश नाही

0
524
Google search engine
Google search engine

अमरावती –

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या दोन अभ्यासक्रमांच्या सन-2017 या ‘सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET 2017) आज गुरुवार दि. 11 मे, 2017 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० उमेदवारांनी नोंदणी केली असून यात २ लाख ३२ हजार ३०७ मुले, १ लाख ५७ हजार १८८ मुली व २५ ट्रांसजेन्डर उमेदवार आहेत. त्यापैकी १ लाख ४४ हजार ८१३ उमेदवार पीसीएम, ९५ हजार ५४५ उमेदवार पीसीबी व  १ लाख ४९ हजार १६२ उमेदवार पीसीएमबी ग्रुप साठी परीक्षा देत आहेत. सदर परीक्षा दि. 11 मे, 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, गणित विषयाचा पहिला पेपर सकाळी 10.00 ते 11.30 वाजता, फिजीक्स व केमिस्ट्रीचा दूसरा पेपर 12.30 ते 2.00 वाजता, तर बायोलॉजीचा तिसरा पेपर दूपारी 3.00 ते 4.30 वाजता या वेळेत होणार आहे. 
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.