तीवस्यात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासून ,चपलांनी बडवून निषेध व संताप व्यक्त

0
558
Google search engine
Google search engine

तिवसा –

 रावसाहेब दानवे हे खासदार असून संविधानिक पदावर असणाऱ्या अशा व्यक्तीने बेताल व असभ्य वक्तव्य शेतकरी राजा बद्दल करून ते किती सुसंस्कृत आहे हे सर्व महाराष्ट्र राज्याला दिसले . आज शेतकरी हवालदिल झाला असतांना त्यांना आधाराची गरज आहे आणि हे सत्ताधारी नेते शिवीगाळ करता आहेत याचा करावा तितका निषेध कमीच आहे.


राज्यभर याचे तिव्र पडसाद उमटले असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तिवसा शहर युवक काँग्रेस च्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या वतीने मस्तवाल रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासून ,चपलांनी बडवून निषेध व संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी शेतकरी बंधू सुद्धा उपस्थित होते.
निषेध आंदोलनात तिवसा न पं उपाद्यक्ष वैभव स वानखडे, शहर काँग्रेस अध्यक्ष अतुल वै देशमुख ,नगरसेवक मधुकर भगत, सचिन गोरे, नरेंद्र विघ्ने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगेश वानखडे, यु कां अध्यक्ष सागर राऊत, यु कां चे स्वप्नील गंधे, वैभव काकडे, अंकुश बनसोड, आशिष ताथोडे, प्रशिक शापामोहन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तिवसा येथे उपस्थित होते.