सोलापूर येथे व्याख्यानांद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांचे रोवले रोपटे !

0
612
Google search engine
Google search engine
सोलापूर –
 येथील रेणुकानगरी येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर सौ. राजश्री देशमुख आणि सौ. वर्षा वैद्य यांनी मार्गदर्शन केले. येथे सनातनच्या ग्रंथांचेही प्रदर्शन लावण्यात आले.

विशेष घडामोडी

१. व्याख्यानाला उपस्थित सौ. पूनम सकपाळ म्हणाल्या की, तुम्हा सर्व साधकांच्या बोलण्यातून स्थिरता, समाधान आणि शांती जाणवते. या वेळी त्यांनी नियमित फलक लिखाण करणार असल्याचे सांगितले.
२. नोकरी करणार्‍या श्रीमती निर्मला माने यांना कार्यालयातून घरी येण्यास विलंब होतो; परंतु व्याख्यानाच्या ओढीमुळे त्या लवकर येऊन व्याख्यानाला उपस्थित राहिल्या. तसेच ‘धर्मशिक्षण वर्गामुळे माझ्या जीवनात आनंद आहे’, असे त्या म्हणाल्या.
३. युनिक कोचिंग क्लासमध्ये ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर सौ. राजश्री देशमुख यांनी विचार मांडले. या वेळी ५० विद्यार्थी उपस्थित होते.
४. एका विद्यार्थिनीने विषय आवडल्याचे सांगून आई-वडिलांनाही भेटण्यास सांगितले. एका शिक्षिकेने शौर्यजागरण शिबीर घेण्याची मागणी केली.
५. शेळगी भागात श्री विठ्ठल मंदिरात साकडे घालून ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तेथील उपस्थितांनी हे कार्य चांगले असल्याचे सांगितले.
६. बालाजी गार्डन येथील योगवर्गामध्ये ‘साधना आणि हिंदु राष्ट्राचा विषय’ हा विषय सौ. राजश्री देशमुख यांनी मांडला. व्याख्यानाला २६ जण उपस्थित होते. तेथे सनातनने ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले होते.
७. जिज्ञासू श्री. देवीदास बोल्ली हे अभिप्राय देतांना म्हणाले, ‘‘तुम्ही हिंदु राष्ट्रासाठी इतके सारे काही करत आहात. तेव्हा आम्हीही त्याला हातभार लावायला हवा.’’
८. शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त शुभराय महाराज मठ, दत्त चौक येथे सौ. राजश्री देशमुख यांनी विषय मांडला. या वेळी ६० जण उपस्थित होते. येथे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.