अनुकंपा तत्वावरील मयत चपराशाच्या पत्नीला मिळतात महिण्याकाठी तीन हजार रूपये – धनोडी ग्रा.पं. येथील प्रकार

0
755
Google search engine
Google search engine

ग्रामविकास खात्याच़्या जी.आर.ची पायमल्ली,
वरीष्ठाकडे तक्रार

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील धनोडी ग्रामपंचायतच्या चपराशाचा २१ वर्षाच्या सेवेनंतर आकस्मीक निधन झाले. ग्रा.पं.ने त्या चपराशाच्या पत्नीला अनुकंपा तत्वाखाली ग्रा.पं. च्या कामावर रूजु केले. परंतु त्यांना महिण्याकाठी केवळ तीन हजार रूपये देण्यात येते. त्या तीन हजारात कुटूंबाचा गुजरान होत नसल्याने माझ्या पतीला देण्यात येत असलेला पगार देण्यात यावा अशी लेखी मागणी वनिला शेलोकार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. परंतु अधिकाऱ्यांनी आपले गऱ्हाणे गावच्या ग्रा.पं.ला सांगा असे बोळवण करून त्यांना परत पाठविल्याने तक्रार तरी कोणाकडे करावी असा प्रश्न चपराशाच्या विधवाला पडला आहे.
धनोडी ग्रामपंचायतमध्ये गजानन शेलोकार हे १९९५ ते २०१६ पर्यंत चपराशी म्हणून कार्यरत होते. २/०६/१६ ला गजाननचे निधन झाले. त्यानंतर गजाननची पत्नी वनिता शेलोकार यांना कामावर अनुकंपा तत्वावर रूजू करून घेतले. परंतु वनिता यांना कामाचा अनुभव होईपर्यंत पगार वाढीची मागणी केली नाही. कार्यालयीन अनुभवानंतर त्यांनी पगार वाढीची मागणी केली. १८/१०१६ ला वनिता शेलोकार यांनी ग्रा.पं.व चांदूर रेल्वे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देऊन मागणी केली. पत्र दिल्यानंतर वनिता शेलोकार यांनी चौकशी केली असता तुमच्या पगारवाढीची बाब ग्रा.पं.च्या अधिकारात आहे. यावर आम्ही काही कारवाई करू शकत नाही, असे समजावुन परत पाठविले.

वनिता शेलोकार यांना त्यांचे पती गजानन यांच्या मृत्युनंतर अनुकंपाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी रूजु केले. त्यांचा पगार तीन हजार आहे. अजुन पाचशे रूपयांची वाढ देण्याचा प्रस्ताव आहे. पगार वाढ ठरविणे हे सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायतच्या कार्यकारीणीने घ्यावे असे मी माझे मत दिले आहे.  –डी.एस.धाकडे, सचिव ग्रा.पं.धनोडी