शिवसेनेच यू-टर्न – गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

0
1092
Google search engine
Google search engine

शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही. या भूमिकेवरुन शिवसेनेनं आता यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार श्री अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. 40 हून अधिक जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपला  होऊ शकतो.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.