आमडी ग्राम पंचायत वर भाजप चे विजय झाडे उप सरपंच पदी अविरोध

0
642
Google search engine
Google search engine

चिमूर / महेश कोडापे-

चिमूर तालुक्यातील आमडी ग्राम पंचायत ची निवडणूक मागील महिन्यात झाली असून यात भाजप ने वर्चस्व प्राप्त केले होते उप सरपंच पदाची निवडणूकित विजय झाडे हे अविरोध विजयी झाले
सरपंच पदाची निवडणूक मतदार मधून झाली तेव्हा वामन गुडध्ये हे विजयी झाले होते तर भाजप गटाकडून विजय झाडे , कोमल पांडे, प्रतीक्षा ढोक ,अनुताई खांडेकर, अर्चना गराटे, शोभा डुकसे विजयी झाले होते
उप सरपंच पदाची निवडणूक झाली असताना विजय झाडे हे अविरोध निवडून आले उप सरपंच विजय झाडे यांनी ग्राम पंचायत वर सत्ता काबीज करण्यासाठी चे श्रेय आमदार किर्तीकुमार भांगडीया याना दिले असून ते म्हणाले की आमडी ग्राम पंचायत चा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या मार्गदर्शनात विकास कामे आणणार असल्याचे सांगितले
आमडी ग्राम पंचायत च्या उप सरपंच पदी विजय झाडे ची निवड झाल्याबद्दल आमदार किर्तीकुमार भांगडीया ,भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर ,तालुका महा मंत्री विनोद अढाल, जी प सदस्य रेखा कारेकर,प सदस्य अजहर शेख ,पस सदस्य पुंडलिक मते , प्रमोद लोणकर एकनाथ थुटे ,मनीष नाईक ,बंडू हिवरकर नगरसेवक संजय खाटीक , विकी कोरेकर, आदी शेकडो भाजप कार्यकर्त्यानी व मित्र परिवार नि अभिनंदन केले