पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

0
849
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली –

देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२८ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, राजीव मलिक, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पं. नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. पं.नेहरू यांची जयंती संपूर्ण देशभर ‘बाल दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पं. जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी –कर्मचारी, पत्रकार आणि अभ्यागतांनी यावेळी पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.