बहुजन समाजाच्या पारंपारिक लोककला यांना राजाश्रय द्यावा… कुणबी युवाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना निवेदन

0
821
Google search engine
Google search engine

मुंबई:-  

कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई संलग्न कुणबी युवा यांच्यावतीने रविवार दि. 12 नोव्हेंबर २०१७ रोजी, मुंबई येथील नाट्य परिषदेच्या मुख्य कार्यलयात लोककलांचे जतन व्हावे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना निवेदन देण्यात आले. कोकणातील लोककला नमन,जाखडी नृत्य या लोक कलांच्या समस्येबाबत तसेच कोकणातील या संस्कृतींना शासन दरबारी राज मान्यता मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले आणि याबाबत नार्या परिषदेच्या वतीने पाठपुरवा करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, कुणबी कला मंचाचे प्रमुख युवराज संतोष, कुणबी साहित्यिक कवी पुनित खांडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक निलेश कुळये, प्रचारक सचिन रामाणे, विश्वनाथ कुळये उपस्थित होते. कोकणात शिव काळापासून लोकांचे मनोरंजन, प्रबोधन व्हावे म्हणून अशा लोककलांचा उदय झाला आहे. अनेक दशके कोकणातील स्थानिक ग्रामस्थांनी या कला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. काही मंडळीनी मुंबई, पुणे सारख्या शहरात या लोककला सादर केल्या तर आजपर्यंत ह्या लोककला फक्त आपल्या खिशातून लाखो रुपये खर्च करून सादर करण्यात आल्या..जिवंत ठेवण्यात आल्या परंतु शासनाने किंवा कोणत्याही संस्थेने याची दखल घेतलेली नाही. सरकार चित्रपट-नाटक अशा कृतीना लाखोंचे अनुदान देते..पण कोकणातील आमच्या ह्या लोककलांसाठी एक रुपयाची दमडी शासनाने दिलेली नाही. कोकणातील मंत्री,आमदार-खासदार अशा कार्यक्रमाना हजेरी लावतात..मोठे, मोठी भाषणे ठोकून जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरतात, कुणबी-ओबीसी समाजाला राजकीयदृष्ट्या प्रतिनिधित्व नाही आणि म्हणून हि उपेक्षा सर्वच ठिकाणी समाजाची झालेली आहे. नेहमी उच्चवर्णीयांकडून उपेक्षा..टिंगलटवाळी च्या मानकरी ठरलेल्या आमच्या शेतकरी कष्टकरी समाजाच्या लोककला..लोकनृत्य झालेल्या आहेत. कोकणातील युवा पिढीने यापुढे तरी आपल्या हक्क-अधिकारासाठी जागृत राहावे असे आवाहन युवाध्यक्ष माधव कांबळे यांनी केले आहे.