३ वर्षांत जेवढी बेकारी वाढली, तेवढी ती यापूर्वी कधीच वाढली नव्हती. श्री शरदचंद्रजी पवार

0
759
Google search engine
Google search engine

गडचिरोली :-

आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिनव लॉन येथे जाहीर सभा घेण्यात आली होती . माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री श्री अनिल देशमुख, रमेश बंग, श्री गुलाबराव गावंडे, आ.संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, ऋतुराज हलगेकर उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले,

की

३ वर्षांत जेवढी बेकारी वाढली, तेवढी ती यापूर्वी कधीच वाढली नव्हती. सध्याचा राज्यकर्त्यांनी ही संकटं गांभीर्याने घ्यावीत, असे श्री शरद पवार म्हणाले.
उत्तरप्रदेशचे CM श्री योगींना गायीची किंमत कळते, पण माणसाची किंमत कळत नाही, हे दुर्दैव आहे. गायीच्या नावाखाली गोरगरिबांच्या हत्या करायच्या असतात काय, यांना माणसांना मारण्याचा अधिकार कुणी दिला, असे प्रश्न उपस्थित केले. अलिकडे हे लोक काय खावे आणि काय खाऊ नये, हेदेखील सांगू लागले आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांची अंडी किंवा मटन खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी खाऊ नये काय, काय खावे आणि काय खाऊ नये हे वाराणसीचे लोक ठरविणार काय? धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांना यूपीत परवानगी नाही. ही भूमी यांच्या बापजादांची आहे काय, दुसऱ्यांना मारण्याचा अधिकार यांना घटनेनं दिला काय, अशा प्रश्नांचा पवारांनी भडिमार केला.
शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. परंतु कर्जमाफीनंतर सरकार चावडीवाचन करुन कर्ज असलेल्या शेतकऱ्याच्या अब्रूचा पंचनामा करीत आहे. त्यामुळे गावभर बदनामी होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असा विचार त्याच्या मनात येत आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने आत्महत्या होत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली.
आपण कृषिमंत्री असताना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या गावी गेलो होतो. तेथून दिल्लीला परतल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली. त्यावेळी कोणतेही निकष लावले नाही. परिणामी आत्महत्या कमी झाल्या, याची आठवण पवारांनी करुन दिली.