राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र संपन्न.

0
791
Google search engine
Google search engine

अमरावती :-

जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आज दि. १६ नोव्हेंबरला ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ स्मिता देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या चर्चासत्रात दै. विदर्भ मतदारचे संपादक श्री दिलीप एडतकर, दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी श्री गिरीश शेरेकर, दै.सकाळचे प्रतिनिधी गोपाल हरणे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन जनसंवाद विभागप्रमुख डॉ. कुमार बोबडे, प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार व आभार प्रदर्शन जयंत सोनोने यांनी केले.

कार्यक्रमाला डॉ. किशोर साबळे, प्रा. अविनाश देशमुख, डॉ. महेंद्र मेटे, डॉ. वर्षा चिखले, प्रा.जी.जी.भारती, प्रा.रुपेश फसाटे, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा.अर्चना सदार व पत्रकारितेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय प्रेस परिषदेची स्थापना दि. 4 जुलै1966 रोजी, तर विधीवत कार्य दि. 16 नोव्हेंबर 1966 रोजी सुरु झाले. त्यानिमित्त 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय प्रेस दिवस म्हणून साजरा होतो.