जीवनात सद्गुरू भेट आवश्यक

0
1564
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:-समीर देशमुख

शेगाव:-(मटारगाव) प्रा. डॉ. हरिदास आखरे
मानवी जीवन कल्याणासाठी सद्गुरू भेट आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित प्रवचनाचे पाचवे पुष्प श्रीमती कोकीलाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील प्रा. डॉ. आखरे यांनी गुंफले.प्रवचनात संत ज्ञानेश्वरीतील सद्गुरू महिमा वर्णन करताना ते म्हणाले की, जीवनात योग्य सद्गुरू प्राप्त झाल्यास जीवन यशस्वी होऊन कृतार्थ होते. त्यासाठी त्यांनी

म्हणोनि जाणतेनो श्रीगुरु भाजिजे । तेणे कृतकार्या होइजे।।
जैसे मूळ सिंचन सहजे । शाखा पल्लव संतोषती ।।

या ओवीवर प्रवचन चिंतन मांडले.
जीवनात सद्गुरू भेट म्हणजे आनंदाची व जीवन सफलतेची प्राप्ती होते.
त्यासाठी संत निवृत्ती नाथसारखे गुरू व संत ज्ञानेश्वरासारखे शिष्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

आज ज्ञान हाच माणसाचा खरा गुरू आहे. ते प्रत्येकाने योग्य ग्रंथातून व योग्य व्यक्तीकडून प्राप्त केल्यास यशाचा व कल्याणाचा मार्ग सापडतो.वर्तमान युगात ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येक युवकाने आपल्या प्रयत्नांना गतिमान करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यर्काने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व देशाच्या समृद्धी साठी करावा.योग्य मार्गदर्शन व योग्य जीवन आचारसंहिता आपल्यास समाधान प्राप्त करून देईल.

मनुष्य जीवन क्षणभंगुर असल्याने त्या जीवनातील प्रत्येक क्षणाला उपयोगी बनवून त्याचा आनंद मानावा.

“आज प्रत्येकजण आनंदासाठी पैशासाठी धावत आहे परंतु योग्य मार्ग न सापडल्याने अशांतीच्या तणावाच्या आडमार्गाला लागलेला आहे. त्यासाठी योग्य ज्ञानाची व मार्गदर्शकाची आवश्यकता प्रत्येकाला आहे.
असे विचार त्यांनी व्यक्त केले.
प्रवचनाला पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती.