बचपन प्ले स्कुलमध्ये बालदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

0
813
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 128वी जयंती शहरातील बचपन प्ले स्कुलमध्ये साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या संचालिका मिनाक्षी रॉय यांनी नेहरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. स्व. नेहरुजींना लहान मुलं खुप आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणूनही साजरा करण्यात येत असतो. अशातच बचपन प्ले स्कुलमध्ये बालदिनानिमित्त नृत्य, संभाषण,वेशभुषा असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

लहान विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांचे, स्पायडरमॅन व इतर वेशभुषा धारण केल्या होत्या. तसेच शिक्षकांनी सुध्दा नृत्याव्दारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेच्या संचालिका मिनाक्षी रॉय, प्रज्ञा नागोसे, प्रिया बिजवे, पुजा गुल्हाणे, छाया भोयर, निलीमा ढगे, प्रतिक्षा पानबुडे, स्वाती वानखडे, प्रणाली कैलकार, संगिता कडवे, निलेश दुर्गे आदींनी अथक परीश्रम घेतले.