अनिल चौधरी, पुणे
बॉलिवूड विनोदी चित्रपट असं म्हणता येईल त्या भांगोवर चित्रपटाचे प्रदर्शन लवकरच होत असून विविध क्षेत्रात कार्यरत राहुन आपला ठसा निर्माण करणाऱ्या तीन महिलांच्या दमदार भुमिकेने साकारलेल्या या चित्रपटाद्वारे रसिकांना आनंद आणि तेवढेच विचाराला खाद्य मिळणार आहे. या चित्रपटात नवांगद तसेच ताकदीचे कलाकारांचे चांगले योगदान लाभले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाब येथील समाजजीवन आणि संस्कृतिशी निगडीत अशा विषयाला अनुसरुन प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातील प्रमुख भुमिकेत प्रेरीका अरोरा ही पुण्यातील गुणी कलाकार नायीकेच्या भुमिकेत समोर येणार आहे. तिचा संपुर्ण परिवार हा देशसेवेशी निगडीत आहे. तीचे वडील सेवा निवृत्त लष्कर अधिकारी तर तीचा भाऊ सैन्य तर बहिण नौदलात कार्यरत आहे. प्रेरीका या चित्रपटात नायीकेची भुमिका साकारणार आहे. मिनाक्षी अय्यर या ह्या चित्रपटाच्या निर्मात्या असून त्या कला आणि संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. या चित्रपटाचे कथानक निशा, सुदिपा, राम, सागर आणि रवि या पाच मित्रांच्या संबंधातील कहाणीशी निगडीत असून हा चित्रपट रसिकांना आवडेल यात शंका नाही.