ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत वर्षातील 15 दिवस सूट

0
494
Google search engine
Google search engine

भंडारा :-

ध्वनी प्रदूषण(नियमन)(नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाच्या सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेलया स्पष्टीकरणानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादिच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामाजिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष या सारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अधिसूचनेद्वारे सन 2018 या वर्षाकरीता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 15 दिवस जाहिर केले आहे.
यात शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, 1 मे-महाराष्ट्रदिन, गणपती उत्सव 4 दिवस गणेश चतुर्थी स्थापना-गणपती स्थापनेचा दुसरा दिवस- अनंत चतुर्दशी-अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस, नवरात्री 2 दिवस -अष्टमी व नवमी, दिवाळी 1 दिवस लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर अशा 15 दिवसांचा समावेश आहे.
अशीसूट देतांना ध्वनी प्रदुषण (नियमन)(नियंत्रण) नियम 2000 च्या नियम व अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसचे उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ही सूट राज्य शासनामार्फत घोषीत शांतता क्षेत्रात लागू नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ध्वनी प्रदूषण नियंत्रक प्राधिकरण व नगर पालिका विभाग यांची राहील अशा प्रकारची परवानगी देतांना ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे असेही या अधिसूचनेत नमूद आहे. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल.