टाटा सुमो उलटून १२ गंभीर जखमी – वलगाव -दर्यापूर मार्गावरील घटना

0
712
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी / गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर /

वलगाव -दर्यापूर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भारधाव टाटा सुमो उलटल्याची घटना शनिवारी दुपारी २.३०वाजता च्या सुमारास घडली, या अपघातात भातकुली तालुक्यातील खालकोणी येथील १२ जण गंभीर जखमी झाले हे सर्व जखमी खारतळेगाव येथे राहणाऱ्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार आटोपून टाटा सुमो ने गावी परत जात असताना अपघात झाला

खारतळेगाव येथील राहणाऱ्या सुनील गजानन जांभळे नामक युवकाचा मुत्यु झाला होता, सुनील च्या अंत्यसंस्काराला उपस्थितीत राहण्यासाठी खालकोणी येथील नातेवाईक टाटा सुमोने खारतळेगाव येथे गेले होते, अंत्यसंस्कार आटोपून सुमोने गावकडे परत येत असताना वलगाव – दर्यापूर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव सुमो रस्त्याच्या कडे ला जावुन उलटली ,गंगूबाई रामराव गाडे वय ६०,सुमत पांडुरंग दुर्गे वय ७०, ताई गुलाब राव गाडे वय ७५, गोकर्णा भाऊराव गाडे वय६५,विमल नामदेव पाटील वय६५,नर्मदा गाडे, वय ७०अरुण चिपर्डे वय ५०, हरिभाऊ गाडे, वय ४५, जनाबाई थोरात वय६५ असे जखमीचे नाव आहे, दरम्यान पी.एस.आय.शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांचे पथक मोठ्या गाडीने अमरावती कडे येत असताना त्यांना हा अपघात दिसला, शिंदे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी सर्व जखमीना वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे,