पथ्रोट जवळील रामापुरच्या उपसरपंचपदी कल्पनाताई नागापूरे यांची निवड

0
1217
Google search engine
Google search engine

​अमरावती – (शहेजाद खान) 
अचलपुर तालुक्यातील पथ्रोट जवळील रामापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिग्गजांना हादरा देत नवनिर्वाचित सरपंच सुनील भुरे यांच्या पॅनलच्या कल्पनाताई नागापुरे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली..

पथ्रोट जवळील रामापूर ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी सुनील भुरे हे विरोधकांवर मात करीत सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आले. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष आता उपसरपंचपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर विरुद्ध गटाने सत्ताधारी गटातील सदस्यांना आमिष दाखवून उपसरपंचपद काबिज करण्याच्या हालचाली केल्या. परंतु नवनिर्वाचित सदस्यांनी सरपंच सुनील भुरे यांच्यावर विश्वास ठेवून सर्वानुमते महिला सदस्य कल्पनाताई सुरेश नागापुरे यांची उपसरपंचपदी निवड केली. सदर निवडणुकीत नऊ पैकी सहा जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या असून एक उमेदवार न्यायालयीन प्रक्रियेत आहे.