*समरसता पंंधरवाड्या अंतर्गत अभाविपचे स्वच्छता अभियान संपन्न*

0
1197
Google search engine
Google search engine
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले –
6 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा सामाजिक समरसता पंधरवाडा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अचलपूर नगर शाखेने साजरा करण्याचे घोषित केले आहे या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
आज 6 डिसेंबर ला डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वान दिना निमित्त पुतळा व परिसर स्वच्छता करण्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अचलपूर शाखेने पुर्वनियोजीत कार्यक्रम नगरमंत्री शुभम काकडे यांच्या नेतृत्वाखाली व पूर्णवेळ विस्तारक आकाशजी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यामध्ये गांधी पूल येथील दिक्षाभूमी,बुध्दविहार राममंदिर नामदारगंज व बुध्द विहार खीडकी दरवाजा येथील भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे व परिसराची स्वच्छता करून पुजन करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी  तेजस शेरकार, गौरव अटलाकर प्रसिद्धि प्रमुख, आदित्य ठाकरे महाविद्यालयीन प्रमुख ,किरण भोंडे कार्यालय मंत्री दिपक सोनोने सहप्रसिद्धि प्रमुख, पवन गझघाटे सहकार्यालय मंत्री, दिनकर माकोड़े सहमंत्री, हरीश चव्हाण, अक्षय पिहुलकर, ओम दापुरकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.