*रिसोड येथे औषध विक्रेता प्रशिक्षण शिबिर संपन्न*

0
966
Google search engine
Google search engine

रिसोड:(रुपेश बाजड) – अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर ला रिसोड तालुक्यातील किरकोळ व घाऊक परवानाधारक औषधी विक्रेत्याकरिता कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण शिबीर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज देगाव येथे संपन्न झाला.या शिबिरात अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त डॉ प्रशांत आस्वार यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक अक्ट १९४०,डी पि सी ओ २०१३ तशेच एन. पि.पि.ए. तील तरतुदी एन. डी.पि.एस. अक्ट १९८५,फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अक्ट २००६,या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी नंदकिशोर झंवर यांची एम. एस. सी.डी.ए.अमरावती झोनच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.व डॉ. प्रशांत आस्वार व प्रा. युवराज पांढरे याना समूर्तीचिन्ह देऊन राजेश पाटील व हरीश लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तरी प्रमुख उपस्थिती मध्ये वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिअशन चे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील शिरसाट,हरीश लाहोटी,नंदकिशोर झंवर प्रा.युवराज पांढरे अकोला जिल्हा सचिव अ. वकार भाई अमोल पाटील सरकटे,हरिभाऊ पाटील खोडके,अनंता देशमुख यांची होती.तरी रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील २१५ औषधी विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमित सोनटक्के यांनी केले तर संचलन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट सचिव नंदकिशोर झंवर यांनी केले.तर आभार प्रदर्शन हरिभाऊ खोडके यांनी केले.कार्यक्रमाची सांगता कॉलेज ऑफ फार्म अल्पोहर देऊन करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनंत देशमुख ज्ञानेश्वर वाळके,महेश मालपाणी अमोल सरकटे,मधू व्यास,चंद्रकांत शर्मा,अभिषेक चरखा,संतोष खोडके,संतोष शेटे रुपेश बाजड,व इतरांनी परिश्रम घेतले.