गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी दोघा संशयितांना अटक

0
570
Google search engine
Google search engine

बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने ताहिर हुसेन आणि शशीधर या दोघा संशयितांना अटक केली आहे. ताहिर शस्त्र पुरवणारा गुंड असून शशीधर सुपारी घेऊन हत्या करणारा गुंड आहे. ताहिर याने शशीधर याला शस्त्रे विकली होती. ताहिर याला काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुन्हे शाखेने पिस्तुल बाळगल्यावरून अटक केली होती. त्यानंतर विशेष अन्वेषण पथकाने त्याला या प्रकरणात अटक केली. आता दोन्ही अन्वेषण यंत्रणा त्यांची चौकशी करत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, या दोघांचा हत्येत सहभाग आहे कि नाही, हे बॅलेस्टिक अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.