एटापल्ली मनसे तालुका अध्यक्षांसहित भाजपचा मुख्य कार्यकर्त्यांनी केला आविसमध्ये प्रवेश

0
823
Google search engine
Google search engine

*एटापल्ली* :-

तालुका मुख्यालयापासून बारा कि.मी.अंतरावरील उडेरा येथे काल आविस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलं होता. या बैठकीला अध्यक्ष म्हणून आविसचे विदर्भ नेतृत्व आणि अहेरीचे माजी आमदार दीपक दादा आत्राम तर प्रमुख अतिथि म्हणून आविसचे युवा नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार उपस्तित होते.
यावेळी एटापल्ली शहरात आणि एटापल्ली तालुक्यात प्रामुख्याने युवक वर्गांमध्ये चांगले ओळख निर्माण करणारे एटापल्ली तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मणीकंठ प्रमोद गादेवार, भाजपचे संपत पैडाकुला, दिलीप पुप्पूरेड्डीवार यांनी मनसे आणि भाजपला सोडचिट्टी देऊन आपापल्या समर्थकांसह आविस नेतृत्वावर विश्वास टाकत आविसमध्ये रीतसर प्रवेश केले.
या सर्व कार्यकर्त्यांची माजी आमदार दीपक आत्राम आणि जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन आविसमध्ये स्वागत केले.
आविस कार्यकर्त्यांचा या बैठकीला आविसचे जेष्ठ नेते आणि माजी जि. प.सदस्य कारुजी रापंजी, जि. प. सदस्या श्रीमती सारिका प्रवीण आईलवार, आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी,पं. स. उपसभापती नितेश नरोटे, प.स.सदस्या श्रीमती संगीता दुर्वा, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, बुर्गी ग्रा.प.उपसरपंच रामाभाऊ तलांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश वैरागडे, श्रीकांत चिप्पावार, गणेश दासरवार, प्रज्वल नागूलवार, शेख खय्युम पठाण , सिरोंचा आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविस सल्लागार रवी सल्लम, पेंटीपाका ग्रा.पं. उपसरपंच कुम्मरी सडवली सह उडेरा गावातील आविसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्तित होते.