(म्हणे) ‘जानव्यामुळे देशाचा नाश झाला !’ -बैलुरू निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामी यांचे ब्राह्मणद्वेषी विधान

0
1043
Google search engine
Google search engine

बेळगाव – १० पैसे मूल्याच्या दोर्‍याने (जानव्याने) देशात दुफळी माजवली आहे.  या दोर्‍याने फास लावून घेतला, तर प्राण जात नाहीत; परंतु तो लोकांचा प्राण घेत आहे, असे विद्वेषी विधान बैलुरू निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामी यांनी येथे केले. सदाशिवनगर येथील स्मशानात आयोजित करण्यात आलेल्या ‘अंधश्रद्धा विरोधी संकल्प दिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वामी पुढे म्हणाले, ‘‘या दोर्‍याने देशात दुफळी माजवून स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा, असे विभाजन करून या देशाचा नाश केला आहे. उडुपी येथे झालेली ‘धर्मसंसद’ ही हिंदु धर्माचे रक्षण करणारी नव्हे, तर चातुर्वर्णातील ब्राह्मणत्वाचे रक्षण करणारी, तसेच वैदिकशाही टिकवणारी संसद होती.शिक्षणमंत्र्यांनी केलेली सावित्रीबाई फुले यांची पूजा करा. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती यांची पूजा करणे सोडून द्या. गंगा नसल्यास पार्वती, पार्वती नसल्यास गंगा, असे द्वंद्व कशाला ? पुराण म्हणजे दुष्टांचा सहवास. पंचांग सांगणारे हे मानसिक आतंकवादी होत.’’