*स्वतंत्र विदर्भ करिता सर्व पक्षीय एक दिवसीय बंदला जुळ्या शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद*

0
565
Google search engine
Google search engine

अचलपूर: / श्री प्रमोद नैकेले –

वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भाच्या विकासाला पर्याय नाही.याकरिता विविध संघटना व राजकीय पक्षांनी मीळून आवाज उठवला पाहिजे म्हणून सर्व पक्षीय एक दिवस विदर्भ बंदच आवाहन देण्यात आले होते.या अनुषंगाने अचलपूर परतवाडा जुळ्या शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला.

अचलपूर परतवाडा शहरात बंटी केजडीवाल यांच्या नेतृत्वाखाली रवी वानखडे,बबलू वानखडे,राहुल वानखडे,कैलाश गणेशे व समस्त कार्यकर्ते यांनी दिंनाक 11 डिसेंबर रोजी शहर बंदचे आवाहन केले होते.वेगळा विदर्भ,अचलपूर जिल्हा घोषित करने व विदर्भावर होणारा अन्याय शासनाने त्वरित दुर करावा ह्या प्रमुख मागण्याकरीता हे एक दिवस बंद आंदोलन असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील सर्व प्रतिष्ठाने,बाजार व शैक्षणिक संस्था या बंद मध्ये बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद नागरीक,व्यापारी व विविध सामाजिक संघटना,संस्था व राजकीय पक्षांनी दिला जवळपास हा बंद स्वेच्छेने शंभर टक्के यशस्वी पार पडला.अचलपूर,सरमसपुरा व परतवाडा पोलीस स्टेशनच्या थानेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कोणतीच अनुचित घटना घडू न देता शांतता व सुव्यवस्थेचे दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता.