श्री महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठान धामोरी तर्फे भव्य नेत्र तपासणी दंत रोग रक्तदान शिबिराचे आयोजन

0
1384
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे –

भातकुली तालुक्यातील धामोरी येथील

श्री ब्रंहलीन ऋषि संत घुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त्य भव्य नेत्र तपासणी दंतरोग व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे उदघाट्कनआचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्हाचे खासदार आनंदराव अडसूळ , माजी आमदार संजय बंड, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे,भातकुली पंचायत समिति सभापति सौ करुणा ताई कोलटके होत्या.कार्यक्रमाचे आयोजन महर्षि वाल्मिकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल भाऊ प्रकाशराव वारघडे, यांनी केले होते. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कडून मोफत शेकडो च्यस्माचे मोफत वाटप करण्यात आले .तसेच त्यांनी त्यांच्या भाषणातून कार्य कर्त्यांना अश्या आरोग्य शिबिराचे जास्तीत जास्त संखेने आयोजन करण्याचे आवाहन केले.

500 ते 600 रुग्णानी या शिबिराचा लाभ घेतला. तर 25 रक्त दांत्यांनी रक्तदान केले,

धामोरी, कुमागड,चेचरवाडी,बैलमारखेडा. परिसरातील तरुण मंडळी आणि महिलांनी रक्तदान केले. सुनील महादेवराव बुट्टे या तरुणाने अपंग असून सुधा रक्तदान केले. तसेच सौ भाग्यश्री अमोल वारघडे या महिलेने धामोरी येथूनच महिला वर्गा मध्ये प्रथम रक्तदान करून महिलाना प्रोत्साहित केले.

रक्तदाना करिता डॉ पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज ची चमू होती तर दांतरोग तपासणी करीता एडवांस्ड डेन्टल अँड ओरल केअऱ सेंटर राजकमल चौक अमरावती येथील डॉ गौरव विधळे व त्याची चमू होती .तर नेत्र रोग तपासणी करीता राजीव गांधी नेत्र हॉस्पिटल अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन आणि डॉ राजेंद्र पाध्याय व त्यांची चमू होती .

शिबिरा करीता सूरज गाळे ,पवन भिडेकर. नारायण सखे, विनोद सखे ,शेखरभाऊ अवघड , दिलीपभाऊ काळबांडे . गोलू ढोलवाडे .अक्षय भांडे, पांडुरगजी चावरे,सूरजभाऊ भोपसे संतोष गादे गजू बोंडाइत किशोर खर्चान. संत घुसरकर महाराज भक्त मोठ्या संख्येने गावातील उपस्थितीत होते,