हिंदू संत, देवी देवतांविषयी वादग्रस्त विधाने प्रा.शाम मानव यांनी टाळावी – हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

0
1670
Google search engine
Google search engine

प्रा.श्याम मानव यांचा व्याख्यानाला विरोध – गाडगे नगर पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी 

अमरावती :- 

अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा अमरावती  आयोजित प्रा.शाम मानव यांचे व्याख्यान रहित करावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी स्थानिक गाडगे नगर येथील वरिष्ठ  पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रा.शाम मानव हे हिंदू देव देवतांच्या विरोधात, हिंदू संतांचा विरोधात  तसेच हिंदू प्रथा रुढींच्या विरोधात प्रचार प्रसार करणारे म्हणून ओळखले जातात व सातत्याने जाहीर कार्यक्रमांतून हिंदू धर्म व देवतांबद्दल खालच्या पातळीवरून टिकाटिप्पणी करत असतात. तसेच हिंदू देव देवतांविषयी आणि हिंदू धर्माविषयी वादग्रस्त विधाने करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असतात. यापूर्वी असे अनेकदा घडले असून शांतता भंग होण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी त्यांचे कार्यक्रम रहित झाले आहेत.अमरावती येथे आज १३ रोजी  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रा.शाम मानव यांनी हिंदू देव देवतांबद्दल , संतांबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल टिकाटिप्पणी केल्यास अथवा वादग्रस्त विधाने केल्यास अमरावती  येथील समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात व शांततेला गालबोट लागू शकते. तसे घडू नये यासाठी प्रा.शाम मानव यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रा.शाम मानव यांचा यापूर्वीही नंदुरबार  येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला होता आणि त्याप्रसंगी त्यांनी हिंदू संत, देवी देवतांविषयी वादग्रस्त विधाने केल्याने संतप्त भावना उमटल्या होत्या.

 

 

निवेदनाद्वारे अशीही मागणी करण्यात आली आहे कि हिंदू धर्मातील कुठल्याही संतानी केलेल्या चमत्कारांविषयी चुकीची माहिती आपल्या व्याख्यानातून सांगू नये ..संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी , चालवलेली भिंत , रेड्याचा मुखी वदवलेले श्लोक , संत तुकाराम यांचा खून नाही तर वैकुंठगमन  या व अशा इतर गोष्टीनमध्ये प्रा . श्याम मानव यांनी चुकीच वक्तव्य करू नये अशी सूचना हि निवेदन मार्फत  करण्यात आली आहे.  यावेळी ठाणेदार  यांनी कार्यक्रमांचा आयोजकांना या संदर्भात कळवण्यात येईल हि शाश्वती दिली.

 

 

 

निवेदन देतांना सौ कांचनताई ठाकूर ,श्री नितीनजी व्यास , तुषार वानखडे- उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, श्री महेश लढके-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री नरेंद्र केवले -शिवसेना शहरप्रमुख ,श्री मानव बुद्धदेव-श्री योग वेदांत सेवा समिती, श्री निलेश टवलारे- हिंदू जनजागृती समिती,श्री ह.भ.प किशोर महाराज आळे -वारकरी जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्ष, निखील फाटे,श्री अजय देशमुख , श्री विलास -सनातन संस्था व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.