रमाई आवास योजनेतील लाभार्थीनी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये–गट विकास अधिकारी  श्री भारसाकळे

0
479
Google search engine
Google search engine

रिसोड(रुपेश बाजड):-

शासनाच्या अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. योजनेचा लाभ मिळविण्याकरिता विहित पद्धती असते परंतु काही महाभाग लाभार्थीना आमिष देऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याचा दावा करतात.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची फसवणूक केली जाते व नाहकच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते हे टाळण्यासाठी पंचयात समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी व तशेच सभापती आणि सर्व पंचायत समिती सदस्य यांनी कोणालाही एकही रुपया चुकीच्या मार्गाने न देण्याचे आवाहन केले आहे. वर्ष २०१७-१८ करिता रमाई आवास योजने करिता लाभार्थी कडून दि १५ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज पंचायत समिती ला मागविन्यात येत आहेत. सदर अर्जा साठी कोणतीही फी नाही. फक्त लाभार्थी यांनी झेरोक्स केंद्रवर मिळणाऱ्या अर्जा सोबत जातीचा दाखला, उतपन्नाचा दाखला, जागेचा नमूना८, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुक ची झेरोक्स, जॉब कार्ड झेरोक्स, अपंग दाखला( असल्यास) हे कागदपत्र जोडावे.योग्य लाभार्थीला योजनेचा लाभ दिला जाणार असल्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार होणे चुकीचे आहे.