मथुरा पोलिसांना मिळणार्‍या नवीन गणवेशावर भगवान श्रीकृष्णाच्या चित्राचे बॅच असणार !

0
575
Google search engine
Google search engine

मथुरा – उत्तरप्रदेशच्या सरकारने येथील वृंदावनला पवित्र स्थान म्हणून घोषित केल्यानंतर आता मथुरेतील पोलिसांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. या गणवेशावर खांद्याच्या ठिकाणी लावण्यात येणार्‍या बॅचवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र असणार आहे. तसेच तेथे ‘पर्यटन पोलीस’ असे लिहिण्यात येणार आहे. पोलिसांना विशेष ओळख देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ता विवेक बंसल यांनी म्हटले की, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. सरकार कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा त्याला संरक्षण देऊ शकत नाही. अशा प्रकारचे बॅच लावले जाणे राज्यघटनेच्या विरोधात आहे.

निवृत्त पोलीस महासंचालक बृजलाल यांनीही विरोध केला आहे. यामुळे पोलिसांची धर्मनिरपेक्ष ओळख रहाणार नाही, असे बंसल म्हणाले.