मित्रासह रिक्षाचालकाचा महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

658

पुणे : विशेष प्रतिनिधी –

*मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे.*

*ठळक मुद्दे* . *मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे.रिक्षेमध्ये एकटी बसलेल्या महिलेला जबरदस्तीने कोंढव्यातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे- मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. रिक्षेमध्ये एकटी बसलेल्या महिलेला जबरदस्तीने कोंढव्यातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 23 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. सतिश माने व बालाजी शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला येरवडा येथिल राहणारी आहे. तिचा पती कोंढव्यात रहात असून त्यांचा घटस्फोट झाला आहे. 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी तिचं भावाबरोबर भांडणं झालं, त्यामुळे ती घराबाहेर पडली व रिक्षाने एनआयबीएम रोडवर आली. पतीबरोबर संपर्क साधण्यासाठी तिने तेथील एका सोसायटीच्या वॉचमॅनकडे मोबाइल मागितला. पण त्याने दिला नाही. तेथून ती चालत जात असताना एक रिक्षा आली. त्यात बसून तिने कोथरूडला जायचे असे सांगितले. तिला एकटीला पाहून रिक्षा चालकाने मित्राला फोन करून बोलावून घेतले. वाटेत तो मित्र आला. त्याने जबरदस्तीने कोंढव्यातील सिध्दार्थ नगरमधील एका खोलीत नेले व त्या मित्राने तिच्यावर रात्रभर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर रिक्षाचालकाने पीडित महिलेला हडपसर येथील हांडे वाडी येथे एका खोलीत नेऊन दारु पाजली व तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला बोलून घेतले व तिला सोडायला सांगितले. त्याने तिला कॅम्प परिसरात सोडलं. पीडित महिला येरवड्याला रात्री पायी जात असताना पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिने घडलेला हा प्रकार सांगितला.कोंढवा पोलिसानी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

जाहिरात
Previous articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन होणार लवकर जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर यांचा प्रयत्ननाला मिळणार यश
Next articleश्री निचत याच्या कडे पंचावतार कार्यक्रमाचे आयोजन-महानुभाव यांनी दर्शवली आपली उपस्थिती