सनातन संस्था म्हणजे ज्यांनी डॉ दाभोळकर ,गोविंद पानसरे ,कलबुर्गी यांचे मर्डर केले ते लोकं -डॉ श्याम मानव याचं टीकास्त्र

0
1854
Google search engine
Google search engine

हिंदुत्वादी संघटनांचा निवेदनावर प्रा  श्याम मानव भडकले

३५ वर्षाचा चांगला रेकोर्ड असताना पोलीस आमचा कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवतात कशे 

 

अमरावती / सुरज देवहाते –

स्थानिक सांस्कृतिक भवन येथे प्रा श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचा २ दिवसा आधी हिंदुत्ववादि संघटनांनी हा कार्यक्रम रहित करण्यात यावा या बाबत एक निवेदन गाडगे नगर पोलिसांना दिले होते ज्यावर गाडगे नगर पोलिसांनी दोन्ही कडचा पदाधिकाऱ्या नोटीसा दिल्या ज्यात हिंदुत्ववादी संघटनाना अशी ताकीद दिली कि कार्यक्रम स्थळी तुम्ही कुठल्याही प्रकारची गडबड करू नये याबाबत – तसेच समोरचा अनिस ला तुमचा वक्त्यांनी  चुकीचा गोष्टीवर किवा काहीही बोलू नये याबाबत पोलिसांनी नोटीसा दिल्या त्यावर श्याम मानव हे चांगलेच भडकले यावेळी त्यांनी हिंदूजनजागरण समिती सनातन संस्था यावर जोरदार टीकास्त्र सोडल यावेळी ते म्हणाले कि हिंदू जनजागृती म्हणजे सनातन संस्था ची युथ विंग  असेही  म्हणाले पुढे त्यांनी सनातन संस्था म्हणजे ज्यांनी डॉ दाभोळकर ,गोविंद पानसरे ,कलबुर्गी यांचे मर्डर केले ते लोकं अशी टिप्पणी केली खर तर डॉ दाभोळकर ,गोविंद पानसरे ,कलबुर्गी  याचं बाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील प्रा श्याम मानव यांनी सनातन लाच दोषी ठरवलं हे  महत्वाच . अमरावती मधील स्थानिक मुरलीधर महाराज , शंकर महाराज यांचवरही त्यांनी टीकास्त्र सोडल.

 

यावेळी त्यांनी श्री प्रबोधनकार यांना समोर करून संत ज्ञानेश्वर यांनी भिंत चालवली नाही व रेड्याचा मुखातून वेद वदवलेच नाही अस ठाम मत मांडल तसेच जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा खून झाला असेही ते म्हणाले.

 

 

 

प्रा श्याम मानव यांनी केलेल्या वक्तव्याचा विदर्भ24न्यूज समर्थन करीत नाही