वृत्तपत्रविक्रेत्यांना शासनाकडुन अर्थसहाय्याचा लाभ सुरु करा- संग्रामपुर तालुक्यातील वृत्त़पत्र विक्रेत्यांची मागणी

0
627
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण /बुलडाणा :-

संग्रामपुर तालुक्यातील वृत्तपत्रविक्रेत्यांना शासनाकडुन अर्थसहाय्याचा लाभ सुरु करण्याबाबत जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांना दि.15डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या निवेदनात नमुद की गेल्या 25 ते 30 वर्षापासून तालुक्यात विविध प्रकारचे विविध भाषेतील वृत्त़पत्र ग्रामिण भागात वितरणाचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत आहोत केंद्र व राज्य़ शासनाच्या तशाच विविध विभागाची माहिती सर्व सामान्य़ व गरजु व्यक्ती पोहचण्याचे कार्य करत असतांना शासनाकडुन कोणत्याच प्रकारचा सोई सवलती मिळत नाहीत .

वाचनाचे किती महत्व़ आहे ही बाब सांगण्याची गरज नाही केंद्र व राज्य़ सरकार व शासनाचे विविध विभाग विविध वृत्त़ पत्रांना लाखो करोडोच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकाला व्हावी या उददेशाने जाहिराती दिल्या जातात जाहिराती ज्या उददेशाने दिल्या जातात तो उददेश सार्थकी लावण्याचे काम वृत्तपत्रविक्रेते प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांचे मोबदल्यात वृत्तपत्रे विक्रेत्यांना काहीच शासनाकडुन मिळत नाही. निदान राष्ट्रीय कार्य करणाऱ्या आम्हा असंघटीत विक्रेत्यांना शासनाकडुन काहीतरी आर्थिक सहाय्य़ सुरु व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऊन ,वारा,पावसात विनाशासकीय मोबदल्याचे कार्य करतात वृत्तपत्राचे मालकाकडुन अल्पशे कमीशन मिळते ग्राहकाचे कोणत्याही प्रकारची रक्कम जवळ जमा नसतांना तोंडी भरोश्यावर वृत्तप़त्र वितरण करतात पण आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांना आलेल्या वृत्तपत्राचे बिल वृत्तपत्राचेमालकांना द्यावेच लागते एवढेच नव्हे तर वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्त़पत्र विक्री करता वृत्तपत्र मालकाकडे काही रक्कम अग्रीमजमा ठेवावी लागते अशी मागणी या निवेदनाद्वार करण्यात आली आहे. या निवेदानवर केशवराव घाटे,दिपक चोपडे, विठठल निबोंळकार, शे.रफिक शे.पन्ना, संतोष देऊकार, अशोक दामधर, प्रकाश टाकळकार, यांच्यासह तालुक्यातील वृत्तपत्रविक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .