ई महापरीक्षा वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

0
546
Google search engine
Google search engine

नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयाअंतर्गत पद भरती, शैक्षणिक परीक्षेसाठी सुरू केलेल्या ई महापरीक्षा वेबपोर्टलचे औपचारिक अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध परीक्षेसाठी हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले असून सर्व विभागांच्या पद भरती परीक्षा या द्वारे करण्यात येणार आहेत. 1 ऑक्टोबर पासून हे पोर्टल सुरू झाले असून यावर नोंदणी ते निकाल या सर्व बाबी ऑनलाईन होणार आहेत. तसेच परीक्षांचे निकाल, प्रश्नसंच, परीक्षांचे अहवाल आदी सोय यात उपलब्ध आहे. या पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची पहिली परीक्षा घेण्यात येत असून त्यासाठी  1 लाख 97 हजार 520 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तर त्यातील 1 लाख 55 हजार 57 उमेदवारांनी कालपर्यंत ऑनलाईन परीक्षा दिली आहे. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन उपस्थित होते.